जगता जगता एक शिकलो
नाही जग कोणाचे
आपले नाही कोणी
आपण नाही कोणाचे।।
उगाच नाती जोडत गेलो
नात्यांचा पसारा वाढवत गेलो
भावनांच्या बंधात कोंढत गेलो
स्वार्थीपणाला पेरत गेलो।।
येताना एकटे आलो आणि
जाताना एकटेच जायचे
तरीही या मायाजाळात
कुठवर घुटमळत राहायचे।।
म्हणून म्हणतो नाही जग कोणाचे
आपले नाही कोणी
आपण नाही कोणाचे।।
नाही जग कोणाचे
आपले नाही कोणी
आपण नाही कोणाचे।।
उगाच नाती जोडत गेलो
नात्यांचा पसारा वाढवत गेलो
भावनांच्या बंधात कोंढत गेलो
स्वार्थीपणाला पेरत गेलो।।
येताना एकटे आलो आणि
जाताना एकटेच जायचे
तरीही या मायाजाळात
कुठवर घुटमळत राहायचे।।
म्हणून म्हणतो नाही जग कोणाचे
आपले नाही कोणी
आपण नाही कोणाचे।।
कवी -सचिन गायगोले लोणी अमरावती
18/03/2018
18/03/2018
like
ReplyDelete